गरीबीवर मात करीत पल्लवी चिंचखेडे हिने गाठले यशोशिखरावर,आयएएस परीक्षेत केले सुयश प्राप्त
अमरावती:-
अमरावतीच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर गरीब वस्तीत राहणारी कु. पल्लवी देविदास चिंचखेडे ही मुलगी युपीएससीची आयएएस ही परीक्षा पास झाली आहे. तिचे वडील घराला रंगकाम देण्याचे काम करतात. तर तिची आई मशीनवर शिलाई काम करते. कुमारी पल्लवी ही अमरावती कॅम्प विभागातील बिच्छू टेकडी चपराशी पुरा या स्लम एरियामध्ये राहते. बिच्छू टेकडीतून पाहणाऱ्या नाल्याच्या काठावर तिचे घर आहे. एवढ्या आधुनिक काळातही तिच्या घराला जायला अद्यापही रस्ता नाही.
ती जेव्हा सातव्या वर्गात होती तेव्हा मिशन आयएएस अमरावती या संस्थेने आयोजित केलेल्या सुप्रसिद्ध आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या अमरावतीच्या श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा कार्यशाळेसाठी ती गेली होती. तिचे वडील तिला या कार्यशाळेला घेऊन गेले होते. या कार्यक्रमातून प्रेरणा मिळाल्यामुळे तिचे वडील तिला दुसऱ्या दिवशी अमरावतीच्या विद्यापीठ रोडवरील महापौरांच्या बंगल्यासमोरील जिजाऊ नगरातील डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी मध्ये घेऊन गेले. तिथे त्यांनी संस्थेचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांची भेट घेतली. काठोळे सर हे गेल्या पंचवीस वर्षापासून गरीब व होतकरू विद्यार्थी यांना नाममात्र एक रुपया प्रतिदिन एवढ्या कमी शुल्कात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करतात. पल्लवीने त्यांचे मार्गदर्शन घेतले. प्रा. काठोळे यांनी तिला स्पर्धा परीक्षेची काही पुस्तके सप्रेम भेट दिली. त्यानंतर जेव्हा जेव्हा अमरावतीला स्पर्धा परीक्षा कार्यशाळा व्हायच्या तेव्हा तेव्हा तिने त्या स्पर्धा तुकाराम मुंढे यांच्यापासून तसेच त्यांच्या भाषणापासून प्रेरणा घेऊन कुमारी पल्लवीने मी आयएएस अधिकारी होणारच असा निर्णय पक्का केला व त्या दृष्टिकोनातून तिने सातव्या वर्गापासूनच परीक्षेला तयारीला सुरुवात केली. तिच्या आजूबाजूला साधारणता मजूर वर्ग सामान्य कुटुंबातील लोक राहतात. त्यामध्ये सर्व समाजाचे लोक समाविष्ट आहेत. घरात पुरेशी जागा नाही. अभ्यासाचे वातावरण नाही पण त्या परिस्थितीवर मात करून तिने युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करून अमरावती शहराच्या इतिहासात एक मैलाचा दगड रोवला आहे. ती ज्या भागात राहते त्या भागात अगोदर रान वन होते. त्या भागात विंचू जास्त निघायचे म्हणून त्या भागाला आजही बिच्छू टेकडी या नावाने ओळखले जाते. या टेकडी जवळच वडाळी नावाचा तलाव आहे. परीक्षा कार्यशाळेमध्ये भाग घेतला.पल्लवीच्या घरासमोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा गेलेला आहे. या मार्गावरून सतत ट्रकची येजा सुरू असते. त्यामुळे अभ्यास करताना सतत व्यत्यय येत असतो. पण अशा विपरीत परिस्थितीवर मात करून आज पल्लवी यूपीएससीची परीक्षा पास झाली आहे. आपल्या यशाचे श्रेय तिने आपले वडील देवीदासजी चिंचखेडे यांच्या प्रोत्साहनाला दिले आहे. अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून तिने पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तिने एका खाजगी कंपनीमध्ये तीन वर्ष नोकरी केली. परंतु त्यामध्ये तिचे मन रमले नाही. तिला तुकाराम मुंढे यांचे शब्द आठवत होते. मी आयएएस अधिकारी होणारच, व अखेर तीने यशोशिखरावर गाठलेच.
कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी
चंद्रपूर:-
जिल्ह्यात कार आणि ऑटोचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 2 जणांचा मृत्यू तर 15 जण जखमी झाले आहेत. वरोरा तालुक्यातील येन्सा इथं ही घटना घडली आहे. जखमींवर वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालय उपचार सुरु आहेत.
रामपूर येथे काम संपवून ऊसतोड कामगार ऑटोने वरोऱ्याला जात होते. यावेळी चंद्रपूरकडे जाणाऱ्या बौद्ध भिक्खूंच्या एका कारने त्यांना मागून जोरदार धडक दिली. या अपघातात रंजना चंद्रकांत झुंजूनकर (46) आणि सविता अरविंद बुरटकर (42) यांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण जखमी झाले आहेत. जखमींना वरोरा उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले असून एका गंभीर जखमी झालेल्या महिलेला चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सर्व मजूर वरोरा येथील रहात असून मोलमजुरीसाठी रामपूर या गावात ऊस तोडण्यासाठी गेले होते. परतिच्या प्यारवासाचे वेळी वेळी ही घटना घडली. जखमी मजुरांचे नावे कळू शकलेली नाहीत
गडचिरोली - 76 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांचे गडचिरोली येथील खासदार जनसंपर्क कार्यालयाचे उदघाट्न, खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्रामुख्याने माजी खासदार मारोतराव जी कोवासे, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी शहर अध्यक्ष सतीश विधाते, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, काँग्रेस जेष्ठ नेते प्रभाकर वासेकर, शँकरराव सालोटकर, शालीग्रामजी विधाते, काशिनाथ भडके, अब्दुलभाई पंजवानी, घनश्याम वाढई, सुनील चडगुलवार, रजनीकांत मोटघरे, संजय चने, हरबाजी मोरे, दत्तात्र्यय खरवडे, माधव गावड, रुपेश टिकले, उत्तम ठाकरे, राकेश रत्नावार, मिलिंद बारसागडे, मिथुन बाबनवाडे, संजय मेश्राम, महादेव भोयर, माजिद सय्यद, जावेद खान, राजाभाऊ कुकडकर, बाबुराव गडसूलवार, आय. बी शेख, प्रफुल आंबोरकर, दीपक रामने, उत्तम गेडाम, लालाजी सातपुते, चारू पोहने, निकेश कामीडवार, राजेंद्र आखाडे, रवी मेश्राम, कमलेश खोब्रागडे, तौफिक शेख,चंद्रशेखर धकाते, कृष्णराव नारदेलवार, रुपचंद उंदीरवाडे, श्रेयस बेहरे, कल्पना नंदेश्वर, सुनिता रायपुरे, अपर्णा खेवले, पौर्णिमा ताई भडके, रिता गोवर्धन, कविता उराडे सह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते
महावितरणच्या अधीकाऱ्यासोबत खासदार डॉ. नामदेव किरसान यांची बैठक ; विद्युत विभागातील प्रलंबित समस्यांना तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश
गडचिरोली - :
गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार तथा संसदीय ऊर्जा कमिटीचे सदस्य डॉ. नामदेव किरसान यांनी महावितरण च्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली व गडचिरोली जिल्ह्यातील विदुय्यत विभागातील स्थानिक पातळीवर सुटू शकणाऱ्या विविध समस्या तातडीने मार्गी लावण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
सदर बैठकीत महावितरण चे अधिक्षक अभियंता प्रकाश खांडेकर, कार्यकारी अभियंता संजय डोंगरवार, सह सर्व अधिकारी, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव ऍड. विश्व्जीत कोवासे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, काँग्रेस नेते हरबाजी मोरे, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, श्रेयस बेहरे उपस्थित होते.
अनेक वर्षापासून डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना कृषीपंपा करीता विद्युत मीटर उपलब्ध करून देणे किंवा सोलर पंप बसविण्यास इच्छुक शेतकऱ्यास तातडीने सोलर पंप उपलब्ध करून देणे, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा नियमीत व सुरळीत करण्यात यावे, अतिरिक्त लोडशेडींग करू नये, शासन स्तरावून राबविण्यात येणाऱ्या योजनाचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळवून देणे या सारख्या अनेक विषयावर या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस (श प) विभागीय अध्यक्ष शाहीनभाभी हकीम यांनी दिले नवदाम्पत्याला शुभाशीर्वाद
अहेरी:-
सुंदरनगर ता.मुलचेरा जिल्हा गडचिरोली येथील सहायक शिक्षक कांती मंडल यांच्या स्वागत समारंभ नुकताच आयोजित करण्यात आला होता सदर समारंभ एक उत्साह पुणं आनंददायी प्रसंग होता त्यांच्या संसाराच्या गाडीची नवी सुरुवात होती या समासरंभास राष्ट्रवादी काँग्रेस (श प) गटाच्या विभागीय अध्यक्ष शाहीनभाभी हकीम,वनवैभव शिक्षण मंडळ अहेरीचे उपाध्यक्ष अब्दुल जमीर हकीम (बबलूभैया) व प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ लुबना हकीम यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून नवदाम्पत्यांना शुभाशीर्वाद दिले
हा समारंभ उपस्थितांच्या हृदयात एक सुखद छाप सोडून गेला
यावेळी प्राचार्य लोनबले, प्राचार्य निखुले, वरिष्ठ लिपिक मुक्तदीर भैय्या व बहुसंख्य कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते
चामोर्शी. (ता. प्र.). तालुक्यातीलभेंडाळा येथील शेतामध्ये शेंगा तोडत असताना विषारी सापाने दंश केला. उपचारादरम्यान सदर महिलेचा शुक्रवारी, (दि.24) सकाळच्या सुमारास मृत्यू झाला. रोहिणी गणेश वासेकर (38) रा. भेंडाळा असे मृत महिलेचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार रोहिणी वासेकर या गुरुवारी नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेल्या.
शेतात शेंगा तोडित असतांना दुपारच्या सुमारास त्यांना विषारी सापाने दंश केला. लागलीच त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय उपचारार्थ हलविण्यात आले. दरम्यान शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अकाली निधनाने वासेकर कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
गडचिरोली: गडचिरोली ते वडसा रेल्वे लाईन प्रकल्पाच्या प्रगतीचा कामाचा आढावा घेण्यासाठी आणि प्रकल्पाला गती देण्यासाठी मा.खा. तथा राष्ट्रीय महामंत्री, भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांनी आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या साईटला भेट दिली. . गोगांव, साखरा व पोर्ला या ठिकाणच्या साईटची प्रत्यक्ष पाहणी करत त्यांनी कामाची स्थिती जाणून घेतली व प्रकल्पाशी संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून पुढील दिशादर्शक उपाय सुचवले.
गडचिरोली ते वडसा रेल्वे प्रकल्प जिल्ह्याच्या आर्थिक व सामाजिक विकासाला चालना देणारा मानला जात आहे. या प्रकल्पामुळे वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होऊन रोजगार निर्मितीच्या नवीन संधी निर्माण होतील. गडचिरोलीच्या दुर्गम भागातील विकासासाठी या रेल्वेमार्गाचे मोठे योगदान ठरेल. मा.खा.अशोकजी नेते यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा प्रकल्प गडचिरोलीसाठी विकासाचे नवे दार ठरत आहे. मात्र, पावसाळयापासून व दोन चार महिन्यांपासून व इतर तांत्रिक कारणांमुळे या प्रकल्पाचे काम संथगतीने चालू करत थांबले आहे.
या पाहणीदरम्यान, रेल्वे प्रकल्पाच्या अडचणींचा सविस्तर कामाचा आढावा करण्यासाठी मा.खा नेते यांनी रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत कामाचा आढावा घेतला. प्रकल्पाला वेग देण्यासाठी त्यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, ॲड. संदीपजी धाईत, रेल्वेचे वरिष्ठ खंड अभियंता आर.पी.सिंग, प्रकल्प व्यवस्थापक अरुणजी जैन, कंत्राटदार जैनल, तसेच स्थानिक पत्रकार कैलास शर्मा उपस्थित होते.
मा.खा.अशोकजी नेते यांनी पाहणी करत“गडचिरोली-वडसा रेल्वे प्रकल्प हा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा कणा ठरेल. या प्रकल्पामुळे जिल्ह्यात रोजगाराच्या संधी वाढतील, वाहतूक व्यवस्थेत क्रांती होईल आणि स्थानिकांना सुगीचा काळ येईल. त्यामुळे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे,” असे मा.खा. नेते यांनी नमूद केले.
गडचिरोली-वडसा रेल्वे प्रकल्पाला सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक मानले जात आहे. या प्रकल्पासाठी मा.खा. अशोकजी नेते यांचे नेतृत्व व प्रयत्न विशेष चर्चेचा विषय ठरत असून, या दौऱ्यामुळे प्रकल्पाच्या कामाला नव्याने चालना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गडचिरोली जिल्ह्याचा विकास हा या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीवर अवलंबून आहे, आणि अशोकजी नेते यांच्या मार्गदर्शनाने तो लवकरच साकार होईल, अशी स्थानिकांमध्ये अपेक्षा आहे.
भगवंतराव हायस्कूल इंदाराम येथे डॉ.लुबना हकीम यांनी केले ध्वजारोहण
अहेरी:-
आज 76 व्या गणराज्य दिनाच्या शुभ पर्वावर इदाराम येथील भगवंतराव हायस्कुल येथे डॉ लुबना हकीम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ ककडालवार मुख्याध्यापक मामीडलवार आरोग्य उपकेंद्र इंदाराम सीएचओ सुरभी शिल्पकर, एएनएम सी.सी. मडावी आणि अंगणवाडी सेविका,व सह ,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते
सर्व शिक्षक-शिक्षिकांनी, तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी यथासांग एकत्र येऊन हा दिवस साजरा केला. डॉ. लुबना हकीम यांनी आपल्या भाषणात भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील शूरवीरांची आणि भारतीय संविधानाची महत्ता सांगितली. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकता, सामाजिक जबाबदारी आणि देशाभिमान यांचे महत्त्व पटवून दिले. या खास प्रसंगी शाळेतील विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले, ज्यामुळे सर्व उपस्थितांना मनोरंजन आणि प्रेरणा मिळाली
चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील पळसगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत विहीरगाव नियत क्षेत्र २ मधील कक्ष क्र, ८५८ मधील जंगलात वाघाने गुराख्याला ठार केल्याची घटना आज शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. दयाराम लक्ष्मण गोंडाणे (७०) रा. विहीरगाव असे मृत्तकाचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, चिमूर तालुक्यातील विहीरगाव येथील दयाराम लक्ष्मण गोंडाणे (७०) हा काही गुराख्यांसोबत जनावरे चारायला घेवून गेला होता. दबा धरून असलेल्या वाघाने गुराख्यावर हल्ला करून ठार केले. काही अंतरावर असलेल्या गुराख्यांना मृतक गुराख्याला वाघ तोंडात पकडून फरफटत नेत असल्याचे आढळून आले. त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन प्रचंड आरडा- ओरड करून जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. लगेच मोबाईलव्दारे गावात व विभागाला माहिती देण्यात आली. नागरिक आणि वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. लगेच गुराख्याचे शोध मोहीम सुरू केली. काही अंतरावर मृतदेह मिळाला.
सदर परिसरात काही महिन्यांपासून वाघाचा वावर आहे. अनेक जनावरांचा फडशा पाडला आह. नागरिकांना दर्शन होणे नित्याचेच झाले आहे. त्यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये प्रचंड दहशत आहे. वनाधिकाऱ्यांनी मृत्तदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे नेण्यात आले. या वेळी, वनपरीक्षेत्र अधिकारी योगिता आत्रम,अमोल कवासे वनपाल,वनपाल विनोद किलनाके, निखूरे, वनरक्षक नागलोत, मेश्राम, खारडे, जिवतोडे, जरारे, गेडाम, दुधे, ठाकरे, पोलीस निरीक्षक संतोष बाकल सह पोलीस कर्मचारी वनविभागाचे कर्मचारी हजर होते.मृत्तकाच्या कुटुंबास वनविभागाच्या पन्नास हजाराची आर्थिक मदत करण्यात आली.त्याच्या मागे पत्नी,दोन मुले, एक मुलगी व मोठा आप्त परिवार आहे.
इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथे राष्ट्रीय मतदारदिनी निदर्शने व पत्रकार परिषद
गडचिरोली : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीविरोधात तसेच लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांच्या हक्कांसाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने, इंदिरा गांधी चौक येथे २५ जानेवारी २०२५, निदर्शन आंदोलन करून पत्रकार परिषद घेण्यात आली.
या आंदोलनामध्ये काँग्रेसच्या अनेक प्रमुख नेत्यांसह व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
निवडणूक आयोगाने पारदर्शकता पाळावी, मतदारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यात यावे, लोकशाही व्यवस्थेत हस्तक्षेप करणाऱ्या घटकांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी खासदार डॉ. नामदेवजी किरसान, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, आमदार रामदासजी मसराम, शहर अध्यक्ष सतीश विधाते, महिला अध्यक्ष ऍड. कविता मोहरकर, तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, वसंत राऊत, प्रमाद भगत, प्रशांत कोराम, युवक काँग्रेस अध्यक्ष नितेश राठोड, रजनीकांत मोटघरे, शंकरराव सालोटकर, नंदू वाईलकर, नेताजी गावतुरे, काशिनाथ भडके, हरबाजी मोरे, दिवाकर निसार, संजय चन्ने, घनश्याम वाढई, दत्तात्र्य खरवडे, अजय भांडेकर,रवी मेश्राम, सुभाष धाईत, उत्तम ठाकरे, बंडोपंत चिटमलवार, रुपेश टिकले, दीपक रामने, सुरेश भांडेकर, अनिल भांडेकर, विनोद लेनगुरे, भैयाजी मुद्दमवार, आशा मेश्राम, प्रति बारसागडे, कल्पना नंदेश्वर, अपर्णा खेवले, कविता उराडे, पौर्णिमा भडके, रिता गोवर्धन, गणेश कोवे, जावेद खान, स्वप्नील बेहरे सह सर्व सेल अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, जिल्ह्यातील काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पेट्रोल पंपावरील स्वच्छालय सामान्य लोकांच्या वापरासाठी आता खुले करण्यात आली आहे. याचा वापर करू न दिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतची मनपाच्या आरोग्य विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी रिलायन्स पेट्रोल पंप शहरातील सर्व चालकांना बजावणी दिली आहे. केंद्रीय गृहनिर्माण व नागरिक कार्य मंत्रालयाने तसे आदेश मानपा सर्व पालिकांना काढले आहे. देशभरात स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2024 -25 प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुसार सर्व पेट्रोल पंपावरील स्वच्छालय हे सर्वसामान्य जनतेसाठी खुले राहणार आणि यामध्ये अडथळा आणल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे केंद्रीय गृहनिर्माण व नागरिक कायदा मंत्रालय यांचे कडून आले आहे. ही अधिसूचना सर्व पेट्रोल पंप धारक मालकांना देण्यात आली आहे.
चंद्रपूर, दि. 26 :-शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, वंचित, महिला, युवक-युवती यांच्यासह दुर्बल घटकाला विकासाचा केंद्रबिंदू मानून राज्य सरकार विकासाच्या मार्गावर वाटचाल करीत आाहे. यात चंद्रपूर जिल्हा प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर राहावा, यासाठी तन-मन-धनाने या जिल्ह्याचा पालकमंत्री आणि राज्याचा आदिवासी विकास मंत्री म्हणून सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबध्द आहोत, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सर्वश्री सुधाकर अडबाले, सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त विपील पालीवाल यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, स्वातंत्र्यसंग्राम सैनिक, जेष्ठ नागरिक आदी उपस्थित होते.
शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी सदैव कटिबध्द आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले, जिल्हा प्रशासनाने अनेक उपक्रमातून येथील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे. स्वातंत्र्याच्या इतिहासापासून स्वत:ची ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याला ऐतिहासिक गोंडकालीन वंशाचा वारसा लाभला आहे. या वारसामुळेच येथील संस्कृती बहरली आहे. त्याचे आपण साक्षिदार आहोत. अशा ऐतिहासिक आणि विविधतेने नटलेल्या, वनभूमी, खनिज संपत्तीने परिपूर्ण असलेल्या, तसेच जल, जंगल, जमीन आणि आदिवासी संस्कृतीचा वारसा जपणा-या चंद्रपूर जिल्ह्याचा पालकमंत्री आणि राज्याचा आदिवासी विकास मंत्री म्हणून आज ध्वजारोहण करताना आज मनस्वी आनंद होत आहे.
आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी येथील क्रांतीकारकांनी 1857 मध्ये इंग्रजांविरुध्द क्रांतीची मशाल हाती घेतली. 15 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री भारत स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आले. देश स्वतंत्र झाला तरी देशाचा कारभार भारतीयांच्या हातात नव्हता. आपल्या देशाचा कारभार आपल्याच पध्दतीने चालावा, यासाठी भारताची स्वतंत्र राज्यघटना तयार करण्याचे काम सुरू झाले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता यावर आधारीत तसेच बहुभाषिक, बहुसांस्कृतिक आणि अनेक धर्माचा समावेश असलेल्या या देशाची राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी तयार झाली. तो दिवस आपण ‘संविधान दिन’ म्हणून दरवर्षी साजरा करीत असतो. तसेच भारतीय संविधानाचे हे अमृत महोत्सवी वर्ष सुध्दा आहे.
पुढे पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, चंद्रपूर या नावाने प्रसिध्द असलेला हा जिल्हा प्राचीन काळी ‘लोकापूर’ या नावाने ओळखला जात होता. ब्रिटीशांच्या कारकिर्दीत म्हणजे 1874 पासून हा जिल्हा चांदा या स्वतंत्र नावाने गणला जाऊ लागला. कालांतराने त्याचे नामांतर इंद्रपूर आणि त्यानंतर जानेवारी 1964 चंद्रपूर असे झाले. क्रांतीकारक आणि हुतात्म्यांच्या बलिदानातून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यांच्या बलिदानाने मिळालेल्या स्वातंत्र्याचं सुराज्यात रुपांतर करण्याची जबाबदारी शासन, प्रशासन यांच्यासह प्रत्येक भारतीयाचीसुध्दा आहे. यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तत्पुर्वी पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर त्यांनी परेड संचलनाची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्वातंत्र संग्राम सैनिक, उपस्थित मान्यवरांची आस्थेने विचारपूस केली.
शहिदांच्या कुटंबियांना स्मृतीचिन्ह : पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते शहिदांच्या कुटुंबातील वीर नारी, वीर पिता, वीर माता, शौर्य चक्र प्राप्त जवानांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यात वीरपत्नी वैक्कमा गोपाल भिमनपल्लीवार, वीरपत्नी अरुणा सुनील रामटेके, वीर माता पार्वती वसंत डाहुले, वीर पिता वसंतराव डाहुले, वीरमाता छाया नवले, वीरपिता बाळकृष्ण नवले, शौर्य चक्र प्राप्त सुबेदार शंकर मेंगरे यांचा समावे होता.
उत्कृष्ट काम करणा-या ग्रामपंचायतींचा सत्कार : लोकपयोगी योजनांमध्ये उत्कृष्ट कार्य करणा-या ग्रामपंचायतींचा यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात आकापूर (ता. नागभीड), चिचबोडी (ता. सावली), माजरी (ता. भद्रावती).
००००००
गडचिरोली : "गणतंत्र" दीनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पाटी गडचिरोलीच्या वतीने स्थानिक जिल्हा कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसेच जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी युवक जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, रॉ.कॉ. उपाध्यक्ष योगेश नांदगाये, उपाध्यक्ष फहीमभाई, प्रा. ऋषीकांत पापडकर, जिल्हा सचिव कपील बागडे, विद्यार्थी अध्यक्ष चेतन पेंदाम, युवक तालुका अध्यक्ष कुणाल चिलगेलवार, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष संदीप बेलखडे, जिल्हा सचिव संजय शिंगाडे, फहीम काझी, प्रसाद पवार, लंकेश सेलोटे, प्रणय खैरे, अंकुश झरली, ओझु आकुलवार, समय्या पसुला, तुकाराम पुण्यपवार, ममता ताई, अनिताताई कोलते, राजु वसाके, तुषार रोहणकर, महेश कुळमेथे आदी उपस्थित होते.
गडचिरोली:- मा.खा. अशोकजी नेते यांचे जनसंपर्क कार्यालय, गडचिरोली येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात व देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला.
या विशेष प्रसंगी, माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यांनी उपस्थित जनसमुदायाला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत संविधानाचे महत्त्व आणि राष्ट्रसेवेतील प्रत्येक नागरिकाच्या जबाबदारीवर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाला आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी,समन्वयक प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखाताई डोळस, जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे, कि.मो.प्रदेश सचिव रमेशजी भुरसे,महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा गीताताई हिंगे, जेष्ठ नेते सुधाकरराव येगंदलवार, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारतजी खटी,जिल्हा सचिव वर्षा शेडमाके,मुक्तेश्वर काटवे, विनोद देवोजवार,संजय बारापात्रे, अनिल कुनघाडकर, अनिल पोहनकर ,केशव निंबोड, वैष्णवी नैताम,लता लाटकर, सिमा कन्नमवार, महादेव पिंपळशेंडे, नामदेवराव शेंडे,नरेश हजारे, हर्षल गेडाम,दतु माकोडे,श्रीकांत पतरंगे, अविनाश महाजन, अविनाश विश्रोजवार,हरिश माकडे, राकेश राचमलवार तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी,कार्यकर्ते व महिला भगिनीं तसेच शिवकृपा कनिष्ठ महाविद्यालयाचे कर्मचारीवृंद व विद्यार्थी विदयार्थीनी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी संयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले. राष्ट्रभक्तीचा जागर करणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.
गडचिरोली : शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात ७६ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भव्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष व माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री श्री. अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थितांच्या जयघोषाने वातावरण देशभक्तिमय झाले.
कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. विष्णूमूर्ती दुर्गम, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष तथा ता.महामंत्री श्री. बंडूजी झाडे, प्राध्यापक मोहूले सर, वाटेकर सर, जाडी सर, विश्वास सर तसेच प्राध्यापिका मनीषा रोहनकर मॅडम, पिंपळसेट्टीवार मॅडम, गडपायले मॅडम, मानकर मॅडम, चापले मॅडम यांनी आपली उपस्थिती दर्शवली. याशिवाय शिक्षकेतर कर्मचारी शेट्टे, रोहनकर, हावलादार, नान्होरीकर, संतोषवार, व कांबळे यांनी कार्यक्रमाची यशस्वीता वाढवली.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तिपर गीतांनी उपस्थितांचे मन जिंकले. राष्ट्रीय एकात्मता व देशसेवेचा संदेश देत विद्यार्थ्यांनी आपल्या कला-सादरीकरणातून प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व अधोरेखित केले.
उत्सवाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांचे विशेष योगदान लाभले.
अहेरी : आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जिल्हा अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभहस्ते आज 26 जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालय इंदाराम,भगवंतराव हस्कुल इंदाराम, शिव मंदिर चौक,जिल्हा परिषद शाळा इंदाराम,कस्तुरीबा गांधी इंदाराम येथे ध्वजारोहन संपन्न झाला.त्यावेळी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी प्रजासत्ताक दिनाच्या समस्त जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या.
गडचिरोली दि.२६ :- गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आणि प्रगती यासाठी शासन वचनबद्ध असून जिल्ह्याला उन्नत आणि प्रगत बनवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी केले.
७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ॲड. आशिष जयस्वाल यांनी पोलिस कवायत मैदान येथील मुख्य शासकीय कार्यक्रमात राष्ट्रध्वज वंदन करून नागरिकांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हा पोलिस अधिक्षक श्री निलोत्पल, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार आदि प्रामुख्याने उपस्थित होते.
ॲड. आशिष जयस्वाल पुढे म्हणाले की, गेल्या काही वर्षांत केंद्र आणि राज्य शासनाच्या प्रयत्नांमुळे गडचिरोली जिल्ह्यात विकासाचा वेग वाढला आहे. नुकत्याच दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्यासाठी पहिल्या गुंतवणुकीचा करार करण्यात आला. या करारामुळे जिल्ह्यातील लोह प्रकल्पाला चालना मिळेल. भविष्यातला ‘स्टील हब’ ही नवी ओळख निर्माण करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याचा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 2027 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याच्या ध्येयात महत्त्वाचा वाटा असेल, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.
जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाचा उल्लेख करताना रेल्वे, विमान, आणि रस्ते कनेक्टिव्हिटी प्रकल्प वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घराघरापर्यंत पोहोचवून आर्थिक उत्पन्न वाढवणे आणि जनतेच्या जीवनमानात सुधारणा घडवणे हे शासनाचे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय आरोग्य सेवेतही जिल्ह्याने चांगली प्रगती केली असून भविष्यात अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन ठोस पावले उचलत असल्याचे त्यांनी सांगितले.
समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जिल्ह्याला प्रगतिपथावर नेण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पोलिस दलाच्या माओवादाविरोधी कारवाईचे कौतुक केले आणि लवकरच गडचिरोली जिल्हा माओवादमुक्त होईल, असा विश्वास व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारून जिल्ह्याचा शाश्वत विकास करण्याचा संकल्प केला असून त्याच दिशेने सहपालकमंत्री म्हणून आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्याला प्रगत आणि उन्नत बनवण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू असून भविष्यात गडचिरोली राज्यात सर्वाधिक प्रगत जिल्हा म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी राज्यमंत्री जयस्वाल यांनी परेडचे निरीक्षण केले तसेच परेड संचलनाची मानवंदना स्विकारली. त्याच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी पोलिस दलाच्या श्वान पथकाने आकर्षक प्रात्याक्षिक सादर केले तसेच सांस्कृतिम कार्यक्रमात सरस्वती विद्यालय, विद्याविहार कॉन्व्हेंट, नवजीवन पब्लिक स्कुल, प्रज्ञा संस्कार कॉन्व्हेंट, छत्रपती शिवाजी ॲकेडमी यांनी देखील समुहनृत्य सदर केले.
गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्याला विकासाचे रोलमॉडेल बनविण्याच्या दिशेने शासनाने ठोस पावले उचलली असून, स्थानिक गरजांची पूर्तता व शाश्वत विकासाच्या उद्देशाने सुसंगत व गुणवत्तापूर्ण नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिले.
जिल्हा वार्षिक योजना व खनिकर्म निधीतून होणाऱ्या खर्चाचा आढावा राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल यांनी आज नियोजनभवन येथे घेतला. यात जिल्ह्याचा एकंदरीत विकास आराखडा कसा करता येईल आणि नाविण्यपूर्ण योजना कशाप्रकारे राबविता येईल यावर चर्चा करण्यात आली. बैठकीला आमदार डॉ. मिलींद नरोटे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा पोलिस अधिक्षक श्री निलोत्पल, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार प्रामुख्याने उपस्थित होते.
सहपालकमंत्री ॲड. जयस्वाल यांनी जिल्ह्याच्या एकंदर विकासासाठी नावीन्यपूर्ण योजना राबविण्याची गरज व्यक्त केली. रोजगारनिर्मिती करणाऱ्या योजनांवर भर देऊन स्थानिकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी निधीचा योग्य वापर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी मिशन मोडवर काम करण्याचे आणि केवळ खर्च करण्याऐवजी नियोजनपूर्वक विकासावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यातील खानबाधित क्षेत्रातील लोकांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी खनिकर्म निधीचा प्रभावी उपयोग करण्यात यावा, अशी सूचना जयस्वाल यांनी दिली. जिल्हा विकासासाठी निधीची अडचण नसून योग्य नियोजनाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील विविध गरजा ओळखून त्या पुरवठ्याच्या दृष्टीने कार्यरत राहण्याचे निर्देश देण्यात आले. यासाठी डिस्ट्रीक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन तयार करण्याचा आग्रह धरत, सॅच्युरेशन मोडमध्ये जाऊन विविध विभागांची उद्दिष्टे पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली.
यावेळी सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण, जलसंधारण आणि मानव विकास यांसारख्या विभागांचा आढावा घेण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटन स्थळे विकसित करणे, अतिक्रमण होऊ शकणाऱ्या जागांवर संरक्षण भिंती बांधणे आणि भौगोलिक क्षेत्रानुसार रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, रोजगारातून महिलांचे व युवकांचे सक्षमिकरण या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सादरीकरणाद्वारे वार्षिक योजना आराखड्याची माहिती दिली. 641 कोटी रुपयांच्या मंजूर आराखड्यातून 265 कोटी 45 लाख रुपये निधी प्राप्त झाला असून, त्यापैकी 216 कोटी 39 लाख रुपये विविध यंत्रणांना वितरीत करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
सिडीसीसी बैंकेच्या बोगस भरती विरोधात आंदोलनकर्त्याचे मुंडन आंदोलन.
आमरण उपोषणकर्ते रमेश काळबाँधे यांच्यासह रोहित तुराणकर, अशोक पो्हेकर व इतरांनी मुंडन करुन केला निषेध.
चंद्रपूर :-
सिडीसीसी बैंकेच्या भ्रष्ट व बोगस नोकर भरती विरोधात आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचं जे आमरण उपोषण सुरु आहे त्याचा आज दहावा दिवस असून आमरण उपोषणकर्ते मनोज पोतराजे यांची प्रकृती खालावली आहे, त्यामुळे सामाजिक संघटनाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून सिडीसीसी बैंकेच्या बोगस नोकर भरतीचा निषेध करण्यासाठी समितीचे सदस्य व आमरण उपोषणकर्ते रमेश काळबांधे यांनी आमरण उपोषणाच्या पाचव्या दिवशी स्वतः मुंडन करुन निषेध केला आहे व त्यांनी सिडीसीसी बैंकेच्या अध्यक्ष संचालकांना इशारा दिला आहे की आज आम्ही केवळ मुंडन केलं आहे जर भरती रद्द केली नाही तर तुम्हची प्रतिकात्मक शवयात्रा काढू, दरम्यान यावेळी रोहित तुराणकर, अशोक पो्हेकर व आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या अनेक सदस्यांनी आरक्षण डावलून भ्रष्ट मार्गाने केलेल्या नोकर भरतीचा निषेध केला आहे. यावेळी समितीचे समन्वयक राजू कुकडे, संजय कन्नावार, सूर्या अडबाले, नभा वाघमारे, अनुप यादव, राजेश बेले, आशिष ताजने, महेश वासलवार, सुनील गुढे, विजय तूरक्याल, पियुष धुपे, स्वप्नील देव व इतर समिती सदस्यांची उपस्थिती होती.
राज्यात सद्या सिडीसीसी बैंकेच्या भ्रष्ट नोकर भरतीचा मुद्दा गाजत असून मागासवर्गीय एससी, एसटी व ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण नोकर भरतीत डावलल्याने आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून मागील 2 जानेवारी पासून साखळी ठिय्या आंदोलन आणि 16 जानेवारी पासून समितीचे मनोज पोतराजे आणि 21 जानेवारी पासून रमेश काळाबाँधे आमरण उपोषण करत आहे, परंतु खासकरून सहकार विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे, दुर्दैवाची बाब ही आहे की ज्या जिल्ह्यात राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्याकडे आंदोलनकर्त्यानी निवेदन देऊन मागणी केली की सिडीसीसी बैंकेने आरक्षण डावलून नियमबाह्य नोकर भरती केली त्यावर स्थगिती आणा पण ओबीसीच्या हक्काच्या लढाई लढतो म्हणणाऱ्या हंसराज अहिर जे स्वतःला ओबीसी समजतात ते व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी या लढाईला न्याय मिळवून देण्याचं काम नाही ही खरी चंद्रपूर जिल्ह्याची शोकांतिका आहे. केवळ माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आंदोलनकर्त्याच्या मागणीला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे.
स्कुल बसच्या अपघातात एका चिमुकलीचा करुन अंत तर बरेच विद्यार्थी जखमी
यवतमाळ:-
जिल्ह्यात स्कुल बस चा अपघात होऊन एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामुळे पालकांत चिंतेचे वातावरण आहे. तर अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळमधील उमरखेडमध्ये स्कूल बसला अपघात झाला आहे. यात अपघातात एक विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. या विद्यार्थिनीचे नाव महिमा आप्पाराव सरकटे असं नाव आहे. ती दिवटीपिंपरी येथे राहात होती. यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील दिवटीपिंपरी ते दहागाव दरम्यान ही घटना घडली आहे. उमरखेडच्या दिवटीपिंपरीवरून ही स्कूल बस दहागाव येथील शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन येत होती. यावेळी हा अपघात घडला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. त्वरित वैद्यकीय सेवा बोलवून जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पालकांनी धाव घेतली. मुलांच्या गाडीचा झालेला अपघात पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. लहान मुलांचा आक्रोश अंगावर काटे आणणारा होता. यात एका मुलीचा दुर्दैवी अंत झाला आहे.